Skip to main content

Posts

banjo

आपत्ती निवारण | Disaster Management

आपत्ती व्यवस्थापनाचे आव्हान | Disaster Management

आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींची जबाबदारी | Disaster Management

१. आपत्तीच्या वेळी लोकप्रतिनिधींने शासकीय यंत्रणा व लोकांशी सकारात्मक समन्वय साधावा / ठेवावा. २. बाधित लोकांना व त्यांचे नातेवाईकांना धीर द्यावा. त्यांचे सांत्वन करावे. ३. स्थानिक संसाधनाचा वापर करून आपत्तीची तीव्रता कमी करावी. मान्सून पूर्व करावयाची तयारी १. ग्रामपंचायतीने गटारे / नाली स्वच्छ करून ठेवणे. २. नदीच्या काठावरील अतिक्रमणे / अडथळे काढणे. ३. स्वस्त धान्य दुकानदार यांना शासनामार्फत पुरविण्यात येणारे धान्य व केरोसीनचा पर्याप्त साठा उपलब्ध करून देणे. ४. गावातील ग्रामपंचायतीमध्ये जनतेची सभा घेऊन मुले, महिला व पुरुष यांना पूर प्रतिबंधक परस्थितीशी सामना करण्याबाबत माहिती देणे. ५. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून ठेवणे. ६. सर्व गावांना टीसीएल उपलब्ध करून देणे. ७. ग्रामसेवक, तलाठी, कृषि अधिकारी यांनी गावातील पूल, रस्ते, बांध, बंधारे कमकुवत किंवा नादुरुस्त असल्यास त्याची माहिती संबधित विभागास देणे. ८. पूर परस्थिती उदभवल्यास जनतेला सुक्षित स्थळी हलविणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे. उदा. शाळा, शासकीय इमारत सुस्थितीत करून ठेवणे. ९. आ...

आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळाची जबाबदारी | Disaster Management

१. आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. २. त्यांच्या मदतीने आपणांस मदत आणि सोडवणूक, प्रथमोपचार, माहितीचे वितरण, मृत व्यक्ती आणि जनावराची विल्हेवाट लावणे,    मदतीचे वितरण इत्यादी कार्य करता येतात. ३. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनाविषयी अद्यावत माहिती देणे.

आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी | Disaster Management

अग्निशमन दल अधिकारी यांच्या जबाबदा-या आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल अधिकारी यांनी खालील जबाबदा-या पार पाडणे आवश्यक आहे. १. बाधित क्षेत्रामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करणे. २. जखमी व्यक्तींना रुग्णालयामध्ये स्थलांतरीत करण्यास प्राधान्य देणे. ३. बाधित क्षेत्रामधून सर्व व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे. ४. बाधित क्षेत्रामधील लोकांची विद्युत उपकरणे आणि विद्युत पुरवठा यापासून सुरक्षा करणे. ५. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत ठेवणे. ६. तालुका प्रशासनाशी समन्वय साधून, पडझड झालेल्या घरांमधून लोकांची सुटका करणे. ७. बाधित क्षेत्रामध्ये घडणा-या घटना, तसेच नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचा-याविषयी अग्निशमन नियंत्रण कक्षास माहिती देणे व अतिरिक्त माहिती बाबत कळवणे.

आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदारी | Disaster Management

आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदारी १. जिल्ह्यातील विविध खात्यांची माहिती प्रसार माध्यमास देणे. २. प्रसार माध्यमांशी समन्वय साधणे.

आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी | Disaster Management

१. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप / सर्व्हेक्षण करण्यासाठी तहसिलदारांच्या साहाय्याने पथक तयार करणे. २. शेतीच्या नुकसानग्रस्त लाभधारकांची सर्व्हेक्षणानुसार यादी तयार करणे. २. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करणे. ३. शेतीच्या नुकसानीचे भरपाई वाटप करण्यास जिल्हा व तालुका प्रशासनास मदत करणे.

आपत्तीच्या काळात रेल्वे विभाग व एस. टी. महामंडळाची जबाबदारी | Disaster Management

रेल्वे विभाग आपत्तीच्या काळात १. रेल्वे स्टेशन वरील गर्दीचे नियंत्रित रेल्वे पोलिसांमार्फत करणे. २. लोकांना रेल्वे वेळापत्रका, रेल्वे अपघताविषयी अद्यावत माहिती देणे. ३. लोकांना/ जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात हलविणे. ४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी  अदयावत माहिती देणे. ५. आपत्तीच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि मित्र मंडळेही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. त्यांच्या मदतीने मदत आणि सोडवणूक प्रथमोपचार, माहितीचे वितरण इत्यादी कार्य करणे. एस. टी. महामंडळ व प्रादेशिक परिवहन १. बाधित लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी एस. टी. बसेस उपलब्ध जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून देणे. २. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनास जड संसाधन उपलब्ध करून देणे. उदा. जेसीबी/ क्रेन/ पोकलम डंपर / बस इत्यादी.

आपत्तीच्या काळात दूरसंचार निगम (टेलिफोन सेवा) यांची जबाबदारी | Disaster Management

१. दूरसंचार सेवा पूर्ववत करणे. २. दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी विशिष्ठ गट तयार करणे. ३. अधिक मदतीसाठी तहसिलदारांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा. ४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देईल.

आपत्तीच्या काळात म.रा.वि.वि.कंपनीची जबाबदारी | Disaster Management

पाटबंधारे अधिकारी / कर्मचारी १. अधिक्षक अभियंता २. उप अभियंता ३. कनिष्ठ अभियंता आपत्तीच्या काळात १. विद्युत सेवा पुनर्वत करणे. २. आवश्यकता भासल्यास विद्युत प्रवाह खंडीत करणे. ३. आपत्तीग्रस्त भागातील विजेसाठी पर्यायी व्यवस्था करणे. ४. विद्युत सेवा पूर्ववत करण्यासाठी विविध गट तयार करणे. ५. अधिक मदतीसाठी तहसिलदारांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा. ६. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देणे.

आपत्तीच्या पाटबंधारे व जलसंपदा विभागाची जबाबदारी | Disaster Management

पाटबंधारेअधिकारी / कर्मचारी १. अधिक्षक अभियंता २. उप अभियंता ३. कनिष्ठ अभियंता १. सरासरी पर्जन्यमापक यंत्रा ( Rain Ganges) बसवलेल्या ठिकाणांची यादी दूरध्वनी क्रमांकासहीत जिल्हा नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देणे. २. आपणांकडे असणा-या मनुष्यबळ व संसाधनाची यादी उदा. बोटी उपलब्ध करून देणे. ३. भूकंपमापक यंत्रे (Seismograph ) बसवलेल्या ठिकाणांची यादी दूरध्वनी क्रमांकासहीत जिल्हा नियंत्रण कक्षेस उपलब्ध करून देणे. ४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अद्यावत माहिती देणे. आपत्तीच्या काळात १. धरणातील पाण्याची पातळीची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास माहितीचे अद्यावतीकरण करणे. २. धरणातील पाणी सोडणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षास तसेच संबधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच बाधित होणा-या लोकांना देणे.

आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी | Disaster Management

सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी १. अधिक्षक अभियंता २. उप अभियंता ३. कनिष्ठ अभियंता आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते हे महसूल खात्यास पुढील उपक्रमात खालील प्रकारे समन्वय करेल १. आपत्तीमुळे निर्माण होणारे रहदारीतले अडथळे दूर करणे आणि रस्ता वाहतुकीस पुन्हा खुल्ला करून देणे २. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी  अदयावत माहिती देणे. ३. आपत्ती प्रसंगी तात्पुरते निवारे उभारणेसाठी प्रशासनास मदत करणे.

आपत्तीच्या काळात महापालिका व नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी | Disaster Management

आपत्तीच्या काळात महापालिका व नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी १. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची योग्य साफसफाई केली जाईल याची काळजी घेणे. २. पावसाळ्यात पाणी तुंबल्यास ते पाणी निचरा करण्याची व्यवस्था सज्ज ठेवणे. ३. आपत्तीच्या काळात नागरिकांना शुध्द व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. ४. आपल्या भागात नियमितपणे जंतुनाशकांची फवारणी करणे. ५. आपत्तीग्रस्त भागात अग्निशमन दलाची सेवा कार्यरत करणे. ६. आपत्तीग्रस्त विभागात लोकांना मदत आणि सोडवणूकीची कार्य करणे. ७. आपत्तीच्या काळात जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात औषधोपचार करणे. ८. आपत्तीमुळे निर्माण झालेल्या घाणीची विल्हेवाट लावणे. ९. अधिक मदतीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्याधिकारी जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा. १०. आपल्या विभागातील संसाधनाची माहिती www.idrn.gov.in या वेबसाईट अद्यावत करण्यासाठी माहिती उपलब्ध करून देईल. ११.आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनास बसेस उपलब्ध कर...

आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी | Disaster Management

आरोग्य विभाग अधिकारी १. जिल्हा शल्य चिकित्सक २. निवासी वैद्यकीय अधिकारी ३. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय ४. जिल्हा आरोग्य अधिकारी ५. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ६. वैद्यकीय अधिकारी ( प्रा.आ.कें.) आपत्तीच्या काळात करावयाची कार्यवाही १. उपायात्मक औषधोपचार आणि साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी लोकांना माहिती देणे २. लोकांना दिल्या जाणा-या अन्न, पाणी यावर नियंत्रण ठेवणे तसेच घाण आणि स्वच्छता या बाबींची काळजी घेणे. सदर कामी स्वंयसेवी संस्था आणि खाजगी व्यक्ती यांची मदत घ्यावी. ३. कर्मचारी, औषधे इत्यादीच्या अधिक मदतीसाठी तहसीलदारांमार्फत आरोग्य अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा. ४. जखमींवर आणि अतिसंवेदनशील व्यक्तींवर रुग्णालयात / प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करणे. ५. आपत्तीग्रस्त भागात प्रथमोपचार आणि औषधांचा पुरवठा करणे. ६. हॉस्पिटलमध्ये माहिती केंद्राची निर्मिती करणे. ७. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षासी संपर्क ठेवणे.

आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी | Disaster Management | Apatti

१. आपत्तीच्या ठिकाणी बघ्यांच्या गर्दीस नियंत्रित करणे, गाडयांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी पोलीस प्रशासनास मदत करणे. २. आपत्तीच्या काळात शोध व सोडवणूकीचे कार्य करणे. ३. जनजीवन सुरळीत होण्यासाठी जनतेस मदत करणे.

आपत्तीच्या काळात पोलीस खात्याची जबाबदारी | Disaster Management | Apatti Vyavasthapan

पोलीसविभाग अधिकारी व कर्मचारी १. पोलीस अधिक्षक २. पोलीस उपअधिक्षक ३. पोलीस निरीक्षक ४. पोलीस उपनिरीक्षक ५. पोलीस पाटील पोलीस खाते हे महसूल खात्यास पुढील उपक्रमात खालील प्रकारे समन्वय करेल. आपत्ती काळात १. आपत्ती काळात वायरलेस यंत्रणेमार्फत संपर्क / दळणवळण करेल. २. आपत्तीच्या काळात बघ्यांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतुकीची व्यवस्था लावणे. ३. आपत्तीग्रस्त भागातील संपत्ती आणि मौल्यवान वस्तूचे रक्षण करणे. ४. आपत्तीच्या काळात जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात हलविले जात असताना गर्दी आवरण्याचे कार्य आणि बंदोबस्ताचे कार्य पोलीस प्रशासनामार्फत केले जाईल. ५. मृताची योग्य ओळख करून त्याची योग्य ती कार्यवाही करणे. ६. मदतीस आणि सोडवणूकीस सहजपणे जाता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे. ७. पोलिसांच्या पद्धतीनुसार पंचनामा करणे. ८. रेल्वे स्टेशन, बस स्टँड यांच्यावर नियंत्रण बंदोबस्त ठेवणे. ९. आपत्तीग्रस्त भागाची सातत्याने पाहणी करणे. १०. कायदा व सुव्यवस्था काबूत आणि समाज विघातक प्रवृत्तींना नियंत्रणात ठेवणे. ११. आपत्ती ग्रस्तांना हलवण्यासाठी वाहनाची व्यवस्था...

आपत्तीच्या काळात महसूल खात्याची जबाबदारी | Disaster Management | Apatti Vyavasthapan

महसूल विभाग अधिकारी १. जिल्हाधिकारी २. अप्पर जिल्हाधिकारी ३. निवासी उपजिल्हाधिकारी ४. उपविभागीय जिल्हाधिकारी ५. तहसीलदार ६. मंडळ अधिकारी ७. तलाठी महसूल विभाग जबाबदा-या आपत्तीपूर्व नियोजन १. आपआपल्या विभागावर आपत्ती व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन आपत्ती निवारणासाठी नियोजन करणे. २. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा / तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा / गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे. या आरखडयाचे दोनदा अद्यावतीकरण करणे. ३. आपल्या विभागातील संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे. असेच आपली संपर्क यंत्रणा बिघडल्यास त्यास पर्यायी यंत्रणा तयार ठेवणे. ४. आपआपल्या क्षेत्रात आपत्तीच्या काळात लोकांना हलवण्यासाठी सुरक्षित निवा-यांची व्यवस्था करून ठेवावी. ५. नियंत्रण कक्षाची तपशीलवार व्यवस्था करावी. नियंत्रण कक्ष २४ × ७ मध्ये सुरु ठेवावे.मदत आणि सोडवणूक कार्यासाठी आवश्यक कार्यासाठी आवश्यक असणारे साहित्य जमा करून ठेवावे. उदा. मेणबत्ती,बॅटरी, लाईफ जाकेट, गाडीचे टयूब, पेट्रोमॅक्स, दोर, सर्च लाईट, विविध करवती, मेगाफोन, पोहणा-या व्यक्तीची यादी (फोन नं सहीत) इत्यादी. ६. आप...

माळीण गावातील दरड दुर्घटना - कारणमिमांसा| Disaster Management | Apatti Vyavasthapan

पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करणारे मौजे माळीण गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेले होते. परंतु त्याच दिवशी रात्री एवढी अतिवृष्टी झाली की गावातील जीवनच संपुष्टात आले. दिनांक 30 जुलै, बुधवारची नुकतीच उजाडू लागलेली सकाळची वेळ, माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला, मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब! माळीण गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव. भिमाशंकर पासून 20 कि.मी आणि पुण्यापासून 75 कि.मी अंतरावर वसलेल्या या गावची 7 वाड्यासहित लोकसंख्या 715. मूळ गावामधील 74 घरांपैकी 44 घरे, त्यातील 150 ते 165 पुरूष, स्त्री, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्या सहित मातीच्या ढिगाऱ्याखाली. गावाचे हे दु:खद आणि विदारक चित्र, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आहुपे - मंचर ही एस.टी. बस रात्री अबुपे मुक्कामी. ही बस सकाळी अतिदुर्गम आदिवासी आहुपे मुक्कामाचे गाव सोडून 7।। वाजेपर्यंत को...

महाराष्ट्रातील दुष्काळ व स्थिती | Disaster Management | Apatti Vyavasthapan

संस्कृती विना जल आणि जलविना संस्कृती ही बाब अशक्य आहे. पाणी आणि समाज, नदी आणि समाज, सरोवर सागर, भूजल, पर्जन्य यांचे भिन्न पातळीवर पडलेले नाते, कृषि आणि पाणी यांचे नाते अतूट आहे. पाणी नैसर्गिक देण आहे, निसर्गामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. देशाचे व राज्याचे अर्थकारण अजूनही पावसाळी शेतीवर अवलंबून आहे. पावसाने दगा दिला तर विकासाची घोडदौड रोखली जाते. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस आहे. निसर्ग. पाऊस, पाणी, हवा यांचा उपभोग घेण्याचे ज्ञान जलशास्त्राच्या दृष्टीकोनातून अवगत झाल्यावरच दुष्काळाची व टंचाईची जाणीव कमी होवू शकते. आपल्याकडे टंचाई अनेक प्रकारे जाणवू शकते. पाणी टंचाई, चारा टंचाई, अन्न टंचाई, शेतीत मजुरांची टंचाई या सर्व टंचाई विचाराच्या टंचाईतून बोकाळतात. यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता, जलसंवर्धन, पाणी वापर साठवणूकीचे प्रबोधन, ललित वाङमयाच्या माध्यमातून हसत खेळत रंजकपणे, कथा, कविता, लेख, पत्रकारिता व त्यांची परिणामकता निश्चितच वाढवता येईल या विचारातून सर्व जलतज्ज्ञांनी महाराष्ट्र सिंचन सहयोग या व्यासपीठावरून महाराष्ट्रभर जनहितोपयोगी विचारांची व प्रबोधनाच...