अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांतील पाणी वाढून आसपासच्या परिसरात पसरण्याची परस्थिती म्हणजे थोडक्यात पूर होय. पूर येण्याची कारणे नैसर्गिक कारणे १. नदया- नाल्यांच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परस्थिती निर्माण होते. २. हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे पूर येतात. मानव निर्मित कारणे 1. जमीन समतलीकरण, शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी रूळ, खाणकाम यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची मोठया प्रमाणात धूप होऊन माती नदी- नाल्यांच्या पात्रात साठून नदी-नाल्यांचे पात्र उथळ बनते.त्यामुळे नदी-नाल्यांत अतिरिक्त पाणी वाढून पूर परस्थिती निर्माण होते. 2. भूकंप वा अन्य कारणांमुळे धरणे फुटून देखील पूर परस्थिती निर्माण होते. 3. नदी-नाल्यांत केलेले अतिक्रमण, वाढता कचरा यामुळे पात्र उथळ बनून पूर येतो. पुराचे परिणाम १. पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते. २. पुरामुळे घरे,शासकीय कार्यालये, धान्ये कोठार, बँक, यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ३. रस्ते वाहून जातात त्यामुळे वहातुक सुविधा विस्कळीत होतात. ४....
Comments
Post a Comment