Skip to main content

पूर | Disaster Management | Apatti Vyavasthapan

अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांतील पाणी वाढून आसपासच्या परिसरात पसरण्याची परस्थिती म्हणजे थोडक्यात पूर होय.
पूर येण्याची कारणे
नैसर्गिक कारणे
१. नदया- नाल्यांच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परस्थिती निर्माण होते.
२. हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे पूर येतात.

मानव निर्मित कारणे

1. जमीन समतलीकरण, शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी रूळ, खाणकाम यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची मोठया प्रमाणात धूप होऊन माती नदी- नाल्यांच्या पात्रात साठून नदी-नाल्यांचे पात्र उथळ बनते.त्यामुळे नदी-नाल्यांत अतिरिक्त पाणी वाढून पूर परस्थिती निर्माण होते.
2. भूकंप वा अन्य कारणांमुळे धरणे फुटून देखील पूर परस्थिती निर्माण होते.
3.  नदी-नाल्यांत केलेले अतिक्रमण, वाढता कचरा यामुळे पात्र उथळ बनून पूर येतो.

पुराचे परिणाम

१. पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते.
२. पुरामुळे घरे,शासकीय कार्यालये, धान्ये कोठार, बँक, यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
३. रस्ते वाहून जातात त्यामुळे वहातुक सुविधा विस्कळीत होतात.
४. वीज ,टेलिफोन सुविधा विस्कळीत होतात.
५. मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी झाल्यामुळे परिसरात दृगंधी पसरून रोगराई निर्माण होते.

पुराचे चांगले परिणाम

१. नदी- नाल्यांच्या पात्रात साठलेल्या माती व कचऱ्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढून विहिरींना पाणी लागते.
२. पुरामुळे वाहून येणाऱ्या गाळाचे पुरक्षेत्रात संचयन होऊन चांगली गाळाची सुपीक जमीन तयार होते.
३. पुरामुळे नदी पात्रात अडकलेला कचरा वाहून गेल्यामुळे रोगराई पसरत नाही.
पुरदक्षता

पूर येण्यापूर्वी

१. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा. वृक्ष तोडीस प्रतिबंध घाला.
२. मोठी धरणे बांधण्या ऐवजी छोटी व धरणे बांधा.
३. आगी पासून वनांचे संरक्षण करा.
४. नदी पात्रात अडकलेला केर कचरा बाजूला करून पुन्हा कचरा जमा होणार नाही याची काळजी घ्या.
५. नदी- नाल्यांच्या किनारी संरक्षक भिंती बांधा.
६. नदी- नाल्या शेजारी वस्त्या वाढवू नका.
७. आपण ज्या परिसरात राहतो. ते पूरप्रवण क्षेत्र आहे का? याची खात्री करून आवश्यक ती पूर्वतयारी करा.

पूर आल्यानंतर

१. पाण्याची खात्री नसल्याठिकाणी जाऊ नका.
२. घरातील लहान मुले, वृद्ध, अपंग याच्याकडे विशेष लक्ष दया. त्यांना धीर दया.
३. पुरात बळी पडलेल्यांना मदत करा.
४. उंच जमिनीवर जाण्याचा प्रयत्न करा.
५. विदयुत उपकरणे पाण्याखाली जात असतील तर ती त्वरित बंद करा. कुठल्याही परस्थित त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करू नका.
६. आपल्या घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित किंवा उंचीवर ठेवा.
७. वीज प्रवाह असलेल्या ठिकाणांना पासून दूर उभे राहा.
८. पुराच्या पाण्याचा संपर्क झालेल्या वस्तू खाऊ नका.
९. पूर ओसरल्यानंतर आसपासच्या परिसरात पुराचे पाणी साठू देऊ नका.

Comments

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन - शाळा | Disaster Management School | Apatti Vyavasthapan

प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो शासनाला व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला तर आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोचण्यास मदत होईल. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. शाळेची प्राथमिक माहिती शाळेच्या प्राथमिक माहितीत शाळेचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापक संपर्क क्रमांक,एकूण कर्मचारी, वर्ग, ग्रंथालया, प्रयोगशाळा व इतर वापरांच्या खोल्यांची संख्या याची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती शाळेतील कर्मचारी व पालक यांची शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यांना शाळा आपत्ती व्यवस्थापना संबधी प्रशिक्षण व कौशल्य देणे आवश्यक आहे. या समितीच्या मदतीने शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास प्रत्येकी  २-३ समिती सदस्यांना जबाबदारी देऊन त्यात उपसमित्या गठीत कराव्यात. त्यात अग्निशामक समिती...

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय | Disaster Management | Apatti Vyavasthapan

आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... .... भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. गरज आहे ती फक्त आपल्या तयारीची. ... कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन ! सविस्त...