१. आपत्तीच्या वेळी लोकप्रतिनिधींने शासकीय यंत्रणा व लोकांशी सकारात्मक समन्वय साधावा / ठेवावा. २. बाधित लोकांना व त्यांचे नातेवाईकांना धीर द्यावा. त्यांचे सांत्वन करावे. ३. स्थानिक संसाधनाचा वापर करून आपत्तीची तीव्रता कमी करावी. मान्सून पूर्व करावयाची तयारी १. ग्रामपंचायतीने गटारे / नाली स्वच्छ करून ठेवणे. २. नदीच्या काठावरील अतिक्रमणे / अडथळे काढणे. ३. स्वस्त धान्य दुकानदार यांना शासनामार्फत पुरविण्यात येणारे धान्य व केरोसीनचा पर्याप्त साठा उपलब्ध करून देणे. ४. गावातील ग्रामपंचायतीमध्ये जनतेची सभा घेऊन मुले, महिला व पुरुष यांना पूर प्रतिबंधक परस्थितीशी सामना करण्याबाबत माहिती देणे. ५. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून ठेवणे. ६. सर्व गावांना टीसीएल उपलब्ध करून देणे. ७. ग्रामसेवक, तलाठी, कृषि अधिकारी यांनी गावातील पूल, रस्ते, बांध, बंधारे कमकुवत किंवा नादुरुस्त असल्यास त्याची माहिती संबधित विभागास देणे. ८. पूर परस्थिती उदभवल्यास जनतेला सुक्षित स्थळी हलविणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे. उदा. शाळा, शासकीय इमारत सुस्थितीत करून ठेवणे. ९. आ...
In this website we have collected information about disaster management. This website is helpful for to taking precautions for safety in disaster.