Skip to main content

Posts

भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन | Disaster Management | Apatti Vyavasthapan

उत्तराखंडमध्ये 2013 व माळीणमध्ये 2014 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे, दरडी कोसळल्याने तसेच जमीन खचल्याने भाविक व नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अचानक आलेल्या या आपत्तींमुळे भाविक व नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. मात्र, अशी परिस्थिती येऊच नये व जर अशी आपत्ती आली तर त्यातून कसा मार्ग काढायचा याबद्दलची ही माहिती… उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री हा परिसर अत्यंत डोंगराळ असा प्रदेश आहे. पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. पर्यावरणाचा समतोल बऱ्यापैकी राखला गेला होता. भाविकांचे जथ्थे‍च्या जथ्थे‍ पूर्वी इतक्‍या मोठ्या प्रमाणात येत नव्हते. मात्र, अलीकडे ट्रॅव्हल्स कंपन्या विविध पॅकेज टूर आयोजित करत असल्याने धार्मिक पर्यटनाकडे लोक आकर्षिले जाऊ लागले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली चांगले रस्ते तयार झाले. मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस या परिसरात उभारली गेली आहेत. छोटीमोठी धरणे, पाण्याच्या योजना सुरू झाल्या आहेत. हे सर्व करीत असताना तेथे सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली अनेक प्रकल्प उभे करण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. डोंगर फोडून बांधकामे करण्यात आली. ...

आपत्ती सुरक्षितता व सावधानता | Disaster Management | Apatti Vyavasthapan

अतिपाऊस, वादळ यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीत बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयारी ठेवली असून पावसाळ्यापूर्वीच पूर, वादळ, आग, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीवर मात करुन जीवित व वित्त हानी कशी टाळता येईल, याबाबत प्रशिक्षण देण्यात येवून प्रात्यक्षिकाद्वारे रंगीत तालीम घेण्यात आली. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी आपत्तीतील विविध प्रकारची होणारी हानी कमी करण्यासाठी नागरिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे. पूरपरिस्थिती अथवा वादळ येण्यापूर्वी, आल्यानंतरच्या काळात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत थोडक्यात … पूरापूर्वी घ्यावयाची काळजी :उंच खांबाची बैठक टाकून नद्या व समुद्र किनाऱ्यालगत इमारती उभाराव्यात. पूर्वानुमानासाठी आकाशवाणी, दूरदर्शन वरील बातम्या ऐकत किंवा पाहत चला. अधिकाऱ्यांकडून दिलेल्या सूचनेनुसार धोक्याची ठिकाणे खाली करा, सोडून द्या आणि अधिक सुरक्षित स्थानी, ठिकाणी स्थलांतर करा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत असताना कंदील, बॅटरी, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, कपडे व कागदपत्रं जवळ ठेवा. कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र राहिल असे पहा. श...

पूर | Disaster Management | Apatti Vyavasthapan

अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांतील पाणी वाढून आसपासच्या परिसरात पसरण्याची परस्थिती म्हणजे थोडक्यात पूर होय. पूर येण्याची कारणे नैसर्गिक कारणे १. नदया- नाल्यांच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परस्थिती निर्माण होते. २. हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे पूर येतात. मानव निर्मित कारणे 1. जमीन समतलीकरण, शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी रूळ, खाणकाम यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची मोठया प्रमाणात धूप होऊन माती नदी- नाल्यांच्या पात्रात साठून नदी-नाल्यांचे पात्र उथळ बनते.त्यामुळे नदी-नाल्यांत अतिरिक्त पाणी वाढून पूर परस्थिती निर्माण होते. 2. भूकंप वा अन्य कारणांमुळे धरणे फुटून देखील पूर परस्थिती निर्माण होते. 3.  नदी-नाल्यांत केलेले अतिक्रमण, वाढता कचरा यामुळे पात्र उथळ बनून पूर येतो. पुराचे परिणाम १. पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते. २. पुरामुळे घरे,शासकीय कार्यालये, धान्ये कोठार, बँक, यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ३. रस्ते वाहून जातात त्यामुळे वहातुक सुविधा विस्कळीत होतात. ४....

आग | Flame | | Disaster Management | Apatti Vyavasthapan

इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीची कारणे कोणती असू शकतात ? 1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते. 2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात. 3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते. 4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात. 5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात. आगीचे परिणाम 1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. 3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुक...

भूकंप | Earthquake | Disaster Management | Apatti Vyavasthapan

भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. भूकंपामुळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागे – पुढे , खाली- वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात. मात्र हे आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. कारण बऱ्याच ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता कमी असते. निरिक्षणावरून असे लक्षात येते कि बहुसंख्य भूकंप हे समुद्रात होतात. भूकंपाचीनोंद करणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हटलं जातं. ही नोंद रिश्टर स्केल या गणिती एककात मोजतात. ही यंत्रे बऱ्याचदा मोठया- मोठया धरणांजवळ बसवलेली असतात. कारण अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरुन भूकंप होण्याची शक्यता असते. याठिकाणी भूकंप झालच तर जलाशय फुटून मोठे नुकसान होऊ शकते. भूकंपाची कारणे १.ज्वालामुखीच्या  उद्रेकामुळे भूकंप होतात. 2. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात. 3. पृथ्वीच्या पोटात...

आपत्ती व्यवस्थापन घडयाळ. | Disaster Management Clock| Apatti Vyavasthapan

ऋतू निहाय प्रत्येक गाव व गटाची दिनचर्या, कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्या झोपेतून उठण्याची वेळ वेगवेगळी असते. काही गावात महिला लवकर उठून आवरा-आवर करतात.शेतकरी महिलां बरोबरच उठून गायी- म्हैशीचं दुध काढतात. मुलं बहुदा उशिरा उठतात.या उलट नोकरदार कुटुंब असेल तर महिला लवकर उठतात. पुरुष व मुले उशिरा उठतात. या सगळ्या गोष्टी  एका विशिष्ट नमुन्यात भरल्या तर त्या गावाचं दिनचर्या घडयाळ तयार होईल व ठराविक वेळेत कोण काय काम करतं? कोण कुठं असतं?याची माहिती मिळेल. त्या माहितीच्या आधारे आपत्तीचं नियोजन करणं सोपं होईल.यामुळे दिनचर्या घड्याळास आपत्ती व्यवस्थापन घडयाळ असंही म्हणता येईल. दिनचर्या घडयाळाचे उद्देश/ फायदे १. आपत्तीच्या प्रंसंगी कोण कुठे आहे? हे बाहेरील लोकांना किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना कळवे. त्या प्रमाणे संकट ग्रस्तांना मदत करणं सोपं होईल. २.आपत्ती प्रसंगी सर्वात अगोदर दुर्बल घटकांना मदत करणं सोपं होईल. उदा. लहान मुले, अपंग,वृध्द इत्यादी. ३.या दिनचर्या / आपत्ती व्यवस्थापन घड्याळाचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात वापर करून सरकारला स...

तात्काळ मदतीला 'स्वरक्षा' | Self Protection | Disaster Management | Apatti Vyavasthapan

रस्ते अपघातानंतर तत्काळ मदत न मिळाल्यानेही अनेकांचा जीव जात आहे. आता अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळवी यासाठी महामार्ग पोलिसांनी पुढाकार घेऊन 'स्वरक्षा' नावाचे मोबाइल अप्लिकेशन तयार केले आहे. ६ जानेवारी २०१४ रोजी महामार्ग पोलिसांनी 'स्वरक्षा' नावाचे अप्लिकेशन तयार केले आहे. हे अप्लिकेशन Android मोबाइलसाठी गूगल प्लेमध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या अप्समध्ये सर्व महामार्ग पोलिस विभागांची माहिती देतानाच नजीकचे रुग्णालय, गेराज ( Garage), रूग्णवाहिका, खाजगी रुग्णालय, पोलिस स्टेशन इत्यादी माहितीही मिळते. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक लोकांनी हे अप्लिकेशन डाऊनलोड केले आहे. यात डाऊनलोड करणा-याचे नाव,पत्ता, ब्लडग्रुप, नातेवाईकाचा पत्ता आणि महामार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन नंबर स्टोअर केलेला असतो. या अप्समध्ये top for Emergency या आयकॉनवर क्लीक केल्यास नातेवाईक आणि पोलिसांना एनर्जी एसओएस एसएमएस केला जातो. सदर एसएमएस पाठवणा-यांचे जीपीएस लोकेशन असते. त्यामुळे तत्काळ मदत मिळू शकते.